आज आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तंत्रज्ञान चा संबंध हा येत असतोच. सुरुवात हि भ्रमणध्वनी पासून होते. अन्न वस्त्र आणि निवारा सोबतच भ्रमणध्वनी आणि इंटरनेट हि माणसाची गरजच बनून गेली आहे. बर्याच आवश्यक गोष्टी आपण घरबसल्या अगदी काही क्षणात भ्रमणध्वनी च्या सहाय्याने पूर्ण करू शकतो.सोबतच फोर जी सारख्या तंत्रज्ञान आज सहजरीत्या भारतात शहरी आणि खेडोपाडी आल्याने एक वेगळी क्रांती झाल्याच आपल्याला दिसून येते. गेल्या दहा पंधरा वर्षात तंत्रज्ञान ज्या झपाट्याने वाढत जात आहे त्याचा वेग बघता माणूस विकासाच्या एका वेगळ्या पातळीवर येऊन पोचला आहे.

या तंत्रज्ञान चा फायदा हा देशाच्या तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी व्हायला होणे गरजचे आहे आणि तेच या तंत्रज्ञान चे फलित असले पाहिजे.

संगणक हा देखील मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होऊ पहात आहे किबहुना झालाच आहे असे आपण म्हणू शकतो. आणि संगणक क्षेत्रात जालेल्या तंत्रज्ञान बदलामुळे आज जग एका वेगळ्या वळणावर येऊन पोचले आहे. आज शिक्षण असो किवा विज्ञान,सरकारी क्षेत्र, बँक,खाजगी नोकरी,वैद्यकीय क्षेत्र ,कला आणि क्रीडा,साहित्य,खेळ,वेगवेगळ्या अवकाश मिहीमा,अणु उर्जा अगदी प्रत्येक क्षेत्रात संगणक तंत्रज्ञान येऊन पोचले आहे. यातच भर म्हणून भविष्यात येणर्या तंत्रज्ञान मुळे मनुष्यप्राणी हा आपल्या प्रगतीचे आलेख अधिकाधिक उंचावणार आहे. अगदी आपल्या काल्पनेपलीकडील गोष्टी ज्या कधीकाळी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी शक्य करण्याच काम या तंत्रज्ञान ने केलं आहे किबहुना भविष्यात अजून करणार आहे.

अश्याच काही भविष्यात येणाऱ्या निवडक संगणक तंत्रज्ञान ज्यामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून येतील या बद्दल आपण बोलूयात

पाहिलं महत्वाच तंत्रज्ञान म्हणजे Internet of things

यात जीवनावश्यक असलेल्या प्रत्येक वस्तू या सेन्सोर च्या मदतीने इंटरनेट शी जोडल्या जातील आणि मानवाच्या सहभागाविना काही गोष्टी पूर्ण करता येतील. जसे कि स्मार्ट होम ( हुशार घर ) ज्यात घराची सुरक्षा,घरात वापरल्या जाणार्या चैनीच्या वस्तू चालू बंद करण्याच नियोजन हे तंत्रज्ञान आपोआप करेल यामुळे घरात वापरली जाणारी उर्जा वाचविली जाऊ शकणार आहे.

हे तंत्रज्ञान फक्त घरगुती वापरासाठी मर्यदित न राहता ते वेगवेगळ्या क्षेत्रात वापरले जाऊ शकत आणि हे वापरात देखील येत आहे जसे कि कृषी क्षेत्र,बांधकाम,सुरक्षा,दळणवळण,भारतीय भूदल,वैद्यकीय क्षेत्र,उद्योग,उर्जा व्यवस्थापन,पर्यवरण संतुलन इत्यादी.

दुसरं आणि अत्यंत महत्वाचे तंत्रज्ञान म्हणजे artificial intelligence ज्यालाच machine learning सुद्धा म्हटले जाते. यात यंत्र हे मानवाप्रमाणे विचार करू शकतात आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्या परीने शोधू शकतात. हे एका प्रकारे चमत्कारी आहे. यावर बर्याच खाजगी संस्था सध्या काम करत आहेत. भारतात देखील काही शाळामध्ये मुलांना शिकविण्यासाठी रोबोट वापरले जात आहेत ज्यात हे तंत्रज्ञान वापरले जात आहे.याचे फायदे हे बर्याच क्षेत्रांना होणार आहेत जसे कि संगणक खेळ,खागोल्शाश्त्र,औषध,वाहतूक ,कृषी ,शिक्षण,करमणूक ,माहिती तंत्रज्ञान,सामजिक मध्यम,नेक इत्यादी.आणि याच्या सीमा या अधिकाधिक विस्तारत आहेत.

पुढील काळात मानवासोबत रोबोट म्हणजेच कृत्रिम मानवी यंत्र काम करेल, माणसासोबत वेळ व्यतीत करेल. मानवाला असलेल्या भावना,भाव ते प्रकट करू शकेल.पुढील येत्या काळात युवा वर्ग आपला सहचारी म्हणून देखील या यंत्राचा वापर करतील.

जगभरातील मोठमोठ्या खाजगी कंपन्या यावर काम करीत आहेत.भारतीय संगणक क्षेत्रात देखील या तंत्रज्ञान चा प्रभाव येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणत दिसून येणार आहे.

पुढील तंत्रज्ञान म्हणजे बिग डाटा

पुढील येत्या काळात डेटा म्हणजेच माहिती हे खूप मोठा कामगिरी पार पडणार आहे.बिग डेटा म्हणजेच प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली माहिती. याच माहितीवर प्रक्रिया करून अपेक्षित निकाल मिळविणे म्हणजेच बिग डेटा analitics.हि प्रचंड प्रमाणात साठविलेली माहिती या आधी असलेल्या संगणकावर प्रकिया करणे अशक्य होते फेसबुक ,ओर्याकल ,गुगल ,अमेझोन सारख्या मोठ्मोत्या कंपन्या या क्षेतात काम करत आहेत. भविष्यात यात नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणत उपलब्ध होणार आहेत.

बिग डाटा हे भविष्यात किबहुना आताच वैद्यकीय ,हॉटेल ,सार्वजनिक सुविधा क्षेत्र,सरकारी ,शिक्षण,करमणूक,हवामान अंदाज,दळणवळण,बँक इत्यादी क्षेत्रात वापरले जाईल.

गुगल फेसबुक,इंस्ताग्राम सारख्या कंपन्या आपल्या वयक्तिक माहितीचा वापर करून आपल्या आवडी निवडी ठरवतील आणि अश्याच वस्तू एखाद्या विशिष्ट संकेत स्थळावरून आपल्याला विकत घेण्यास भाग पडतील.याचे उत्तम उदाहरण म्हणजे youtube उघडल्या उघडल्या दिसणारे विदिओ. आपल्याला जे आवडत तेच आपल्या समोर मांडल जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करून केल्या जातात त्याला संगणकी भाषेत डाटा analytics म्हणतात.

Augmented Reality म्हणजेच वर्धित वास्तव

या तंत्रज्ञानात वास्तविक जग आणि cyberspace म्हणजेच इंटरनेट एकमेक्कांना संलग्नित केलं जाईल.यात भ्रमणध्वनी असलेले gps तंत्रज्ञान आणि माहिती यांचा वापर करून tablet किवा भ्रमणध्वनी च्या सहाय्याने आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण बघू शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिकाम्या घरात शोभेच्या वस्तू घ्यायच्या असतील तर tablet वर त्या वस्तू घरात कश्या दिसतील हे तुम्हाला दिसून येईल. जेणेकरून तुम्ही ते खरेदी करू शकता.याचप्रमाणे एखादी इमारत ,व्यक्ती किवा इतर काही माहिती तुम्हाला याद्वारे अचूक मिळू शकेल.

याचबरोबर genetic इंगीनीरिंग, quantum computing सारखे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणत विकसित आणि वापरात येतील.यामुळे वेळ,पैसा आणि मेहनत या तीनही गोष्टी मध्ये बचत होऊ शकेल.5g-6g तंत्रज्ञान मुळे जग अधिक वेगाने एकमेकांशी जोडलं जाईल आणि तंत्रज्ञान अधिकाधिक वेगाने विकसित होईल.२०२१ मध्ये अमेरिकेत पहिला रोबोट येईल जो औषधं उत्पादन कंपनी मध्ये काम करेल.२०२२ पर्यंत जगातील १० टक्के लोकसंक्या इंटरनेट शी जोडले जाणारे कपडे वापरतील.3d प्रिंटींग तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या चारचाकी २०२२ पर्यंत बाजारात येतील.माणसाच्या शरीरात मुद्रित केलेला पहिला मोबाईल २०२३ मध्ये वापरत येईल.सरकार आपल्या जनगणनेत बिग deta चा पवापर सुरु करेल.२०२३ पर्यंत १० टक्के चष्मे इंटरनेट शी जोडले जातील.सरकार कर आकारणी साठी ब्लोक चेन तंत्रज्ञान वापरेल.२०२३ पर्यंत जगातील ९० टक्के लोकांकडे सुपेर्कॉम्पुतर असेल.२०२४ पर्यंत इंटरनेट चा वापर हा मानवाचा मुलभूत अधिकार असेल.३ओ टक्के corporate audit हे artificial intelligence च्या सहाय्याने केले जाईल.जागतिक स्तरावर केल्या जाणार्या यात्रा या उबेर सारख्या माध्यमांद्वारे शरिंग (sharing)करून केल्याजातील.खाजगी वाहनाचा वापर कमी होईल. असे बरेच उदाहरण देता येतील.या सगळ्यांमध्ये संगणकाचा मोठा हातभार असेलच.संगणकाशिवाय हे तंत्रज्ञान विकसिक होण मुश्कील आहे. मानवी जीवनात क्रांती घडून आणण्याच काम वरील तंत्रज्ञान करतील पण महत्वाच म्हणजे हे जेवढ सुखकारक आहे तेवढंच धोक्याची घंटा देणार सुद्धा आहे.

या येणाऱ्या तंत्रज्ञान मुळे बर्याच नोकर्या जातील. मानवाची जागा रोबोट घेतील. ज्यांना कुणाला तंत्रज्ञान माहिती असेल किवा हाताळता येईल त्यांना नोकरी च्या सुवर्णसंध्या भविष्यात असतील.संगणक तंत्रज्ञान भविष्यात मानवासाठी वरदान घेऊन येतील. फक्त याचा वापर समाजातील गरीब , वंचित लोकांचे जीवनमान,शिक्षण आणि इतर संधी उपलब्ध होण्यासाठी झाला तर माणूस खर्या अर्थाने प्रगत झाला किवा होईल असे आपण म्हणू शकू.

भारत देखील जागतिक पातळीवर प्रगतीपथावर आहेच आणि संगणक क्षेत्रात तर अग्रेसर आहेच आहे आणि भविष्यात सुद्धा राहील.

– अमोल नंदकिशोर देशमुख

आमच्या मराठी तंत्रज्ञान लेख स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा लेख.