“मूर” या संगणक अभियंत्याच्या नियमाप्रमाने दर दोन वर्षांनी संगणकाचा आकार लहान होत जाईल तर त्याची किंमत कमी होत जाणार आहे. तर भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मतानुसार येणारा काळ हा संगणक आणि इंटरनेट भोवती फिरणारा असेल.
भविष्यातील संगणक हा मानवी जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. भविष्यातील संगणक  तंञज्ञानाचा ट्रेंड अपल्याला सुचवितो की मानव जाती ने नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी, क्लाऊड व इतर टेक्नोलॉजीज मध्ये प्रवेश केला आहे. आजच्या युगात जिथे मानवाला वापर करूनकाम करावे लागते तिथे  भविष्यात वायरलेस तंञज्ञान आणि नॅनो टेक्नॉलॉजी जगाचा ताबा घेतील.एवढच नाही तर रोबोट्सच्य़ा  निर्माणानंतर मानवी जीवन फार सोपे होईल.
तंञज्ञान इतके प्रगत होइल की, फक्त लॉगिन, पासवर्ड, मजकूर, फोटो, संगीत आणि जे काही  आमच्या डोक्यात आहे, ते आम्ही फक्त विचार करुन नेविगेट करु शकू. मैलांपासुन दुर सामजिकरित्या संवाद साधू, फक्त विचार करून ट्वीट करु आणि कार्य चालू ठेवू. भविष्यातील संगणक तंञज्ञान ज्या लोकांचे हातपाय निकामी आहेत म्हणजेच जे लोक अपंग आहेत त्यांना रोबोटिकसचा वापर करता  येईल व नियमितपणे त्यांचे कामे करता येतील. कार्यप्रणली संगणकाचे  मुलभूत नियंत्रण करतील. सिस्टम सॉफ्टवेयर भविष्यात मानवाला हातावेगळी काम करण्यास मदत करतील ज्याने मानव  विकास साधू शकेल.
इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा आयओटी, जगातील कोट्यावधी भौतिक साधनांचा संदर्भ देते, जे आता इंटरनेटला  कनेक्ट झाले आहे , सर्व डेटा एकत्रित करील. सुपर-स्वस्त संगणक चिप्स आणि वायरलेस नेटवर्कच्या सर्वव्यापीपणाचा आपणास निश्चितच फायदा होत आहे. या सर्व भिन्न वस्तूंना जोडणे आणि त्यामध्ये सेन्सर जोडणे डिव्हाइसेसवर  डिजिटल बुद्धिमत्तेची  पातळी जोडते. इंटरनेट ऑफ थिंग्स आपल्या आजूबाजूच्या  जगाच्या फॅब्रिकला अधिक स्मार्ट आणि अधिक प्रतिसाद देणारी आहे.
आजकालच्या युगात ३ डी सेन्सिंग कॅमेरा आणि अधिक विकसीत स्वायत्त वाहन  चालविण्यासह, वाढत्या सक्षम गतिशीलतेसह  आणि त्यांच्या  सभोवतालच्या  वस्तू मध्ये  फेरफार करण्याची क्षमता   असलेल्या तञंज्ञान आहे. सेन्सर आणि आय्ओटी  विकसित  होताना स्वायत्त रोबोट्स त्यांच्या सभोवतालच्या  जगाची अधिक चांगली जागरूकता घेतील. उदाहरण – लाईट कार्गो, डेलिएव्हरी ड्रोन इत्यादी.
डिजिटल इकोसिस्टिम म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म सामायिक करणारे अभिनेते यांच्यामधील वेब- सारखी कनेक्शन. ज्यामुळे  भौगोलिक  आणि उदोगांमधील विविध संस्थाना  गतिशील   कनेक्शन जोडून सक्षम केले गेले. भविष्यात या मधील विक्रेंदीत स्वायत्त संस्था समाविष्ट असतील , जे मानवा कडून स्वतंत्रपणे काम करवतील.
विकसित एआय आणि विशलेशनेहि पारंपरिक व्यवस्था अंतर्दृष्टी पेक्षा अधिक परिकृष्ट साधने वापरून डेटा किवा सामग्रीचा  स्वायत्त किवा अर्धा स्वायत्त परीक्षा आहे. अल्गोरिथम आणि डेटा सायनस च्या नवीन वर्गाचा हा परिणाम आहे. जो नवीन क्षमता प्राप्ति करतो , उदा. ट्रान्सफर लोगिन, जे आधी परीक्षित मशीन लेअरनिंग मॉडेल्सचा उपयोग तंत्रज्ञानासाठी प्रगत प्रारंभ बिंदू म्हणून करतात. उदा.मशीन लर्निंग ,एज अनॅलिटीक्स आणि कॉम्पुटर नेटवर्क. मशीनलर्निंग संगणकीय आकडेवारीशी जवळून संबंधीत आहे, जे संगणक वापरून भविष्यवाणी करण्या वर लक्ष्य केंद्रीत करते . व्यवसायातील अडचणी लक्षात घेता, मशीनलर्निंगला भविष्यवाणी विश्लेषण म्हाणून संबोधले जाते.
गूगल क्लाऊड प्लॅटफॉम पायाभूत सुविधावरील डेटा संचयीत करण्यासाठी  आणि त्यात प्रवेश करण्यासाठी गूगल क्लाऊड संचयन ही एक ऑनलाइन   फाइल  स्टोरेज वेब सेवा आहे. सेवा गूगल च्या क्लाऊड ची कार्यक्षमता  आणि स्कालेबिलिटी प्रगत सुरक्षा आणि समयीकरण क्षमतांसह एकत्र करते.तो एक आहे एक सेवा म्हणून इन्फ्रास्ट्रचर. गूगल  क्लाऊड संचयन उपक्रमांसाठी अधिक योग्य असल्याचे दिसते
स्मार्ट डिव्हाइस बँकिंगसाठी कादंबरीचे साधन तयार करू शकतात आणि हे सक्षम केले जाऊ शकते आणि डिजिटल सहाय्यकाच्या वापराद्वारे वापरकर्ता आणि  ग्राहकांसाठी हे आणखी सोपे आणि कार्यक्षम केले जाऊ शकते. ही स्मार्ट डिव्हाइस मुख्यता  आमच्या स्मार्ट होम्समध्ये वापरली जातात जिथे ते आमच्या सोफ्यांकडून माहिती घेऊन निर्णय घेतल्यानंतर आपल्या स्वत: च्या वेगाने आम्ही ‘बँक’ निश्चित करण्यास मदत करू शकतात. कॅपिटल वन ही अमेरिकेतील बँक आहे. कॅपिटल वन मोबाइल बँकिंग अ‍ॅपशी जोडल्या जाऊ शकणार्‍या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे त्यांचे कामकाज करण्यात आभासी सहाय्यकाचा उपयोग करण्यास पुढाकार दिला. वेगवेगळ्या कार्यक्षमतेसह त्याच्या क्लायंटचे समर्थन करण्यासाठी. अशा प्रकार च्या वापराचे एक चांगले उदाहरण असे असू शकते जेव्हा एखादी व्यक्ती पुढील प्रश्न विचारत असेल, “कृपया, मला माझ्या चालू खात्यातून मागील महिन्यातील व्यवहार माझ्या ई-मेलवर पाठवा.”
पुढील काही वर्षातच संगणकाचे रुपडेच बदलणार आहे कारण मानवी जीवन अधिक सुसह्य कार्य होण्यासाठी संगणकाचा मानव पुरेपूर वापर करून घेणार आहे.याबद्दलच उदाहरण घ्यायचे झाले तर मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून आगामी काळात नवे रोबोट्स बाजारात उपलब्ध होतील जे रोबोट्स मानवाप्रमाणेच हुबेहूब विचार करू शकतील त्यांना भावना असतील व माणसाप्रमाणेच ते निर्णय घेऊ शकतील.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या दोन तंत्रज्ञानांचा एकत्रित वापर केल्यानंतर मानवी जीवन प्रगतीच्या अत्युच्च पातळीवर जाणार आहे उदाहरणच द्यायचे झाले तर रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या काही काळाने मानवविरहित पद्धतीने धावू लागतील यंत्र मशीन स्वतःहून माणसासारखे निर्णय घेऊ लागतील आणि हे घेतलेले निर्णय अगदी हुबेहूब माणसाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आणि अचूक असतील. म्हणजेच माझ्या घरातील फ्रिज मध्ये सध्या दूध संपले आहे तर माझ्या फ्रीजमधील सेन्सर्स दूध संपले आहे असा मेसेज म्हणजेच संदेश घराशेजारील स्मार्ट शॉप यांना पाठवतील आणि थोड्याच वेळात माझ्या घरी त्यांचा माणूस दूध घेऊन येईल.
वर्चुअल रियालिटी आणि कमेंट रियालिटी या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात आमूलाग्र बदल करता येईल येईल म्हणजेच विद्यार्थ्यांना वर्गातच बसून हिमालयावर नेता येईल येईल तर त्याच वेळी अंतराळात भरारी घेता येईल. वर्गातच समुद्राची भरती आणि ओहोटी दाखवता येईल दिवस रात्र कसे होतात हे दाखवता येईल तर त्याच वेळी वर्गातच सुनामीचे प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना घडवता येईल.
रेल्वे विमान कंपन्या यांनासुद्धा नवीन इंजिनियर्स प्रशिक्षण देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल म्हणजेच बसल्या ठिकाणावरून ते रेल्वे चालवतील विमाने चालवतील त्यावेळी वेगवेगळे हवामान तयार करता येईल म्हणजे पावसाळ्यात विमान कसे चालवायचे वादळ झाल्यानंतर विमान कसे चालवायचे पुरातून रेल्वे कशी काढायची याचे  प्रशिक्षण त्यांना सहज रीतीने देता येतील.
नवीनच उदयास आलेल्या क्वांटम कम्प्युटिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून अनु विद्युत क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल आयटम्स म्हणजेच अनुच्या अगदी छोट्याशा भागावर कार्य करून त्याचा उपयोग मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी म्हणजेच अनुविद्युत मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो व त्यामधून माणसाला पुढील शेकडो वर्षांचा साठी मिळणारी ऊर्जा त्यामधून उपलब्ध होऊ शकते.
डी एन ए कम्प्युटर्स म्हणजेच डी एन ए तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी आरोग्याविषयी असणार या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो म्हणजेच वेगवेगळ्या रोगांवर उपचार कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास केला जाऊ शकतो तसेच पोलीस खाते गुप्तचर खाते यांना डी एन ए टेस्ट अधिक परिणामकारकरीत्या करता येऊन गुन्हेगारांचा शोध घेता येऊ शकतो.
ऑप्टिकल कम्प्युटर्स या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशाच्या विविध छटांचा उपयोग तंत्रज्ञानात करता येऊ शकतो म्हणजेच जसा सूर्याचा प्रकाश मिळतो त्या पद्धतीने ऊर्जा तयार करता येऊ शकते ऑप्टिकल कम्प्युटर चा उपयोग करून इंटरनेट अधिक जलद गतीने उपलब्ध होऊ शकते त्यामुळे इंटरनेटचा वेगही वाढेल व त्याची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणात मिळू शकेल
या नवीन तत्रंज्ञानाला अस्तित्वात आणायचे कसे ?
आजचे युग हे संगणक युग आहे. विविध क्षेत्रात संयोजनेतून गणकाचा वापर केला जातो परंतु संगणकाचे शिक्षण जर मातृभाषेतून दिले गेले तर सर्वसामान्य व्यक्ती प्रगत होईल .इंटरनेट च्या मदतीने तो सहज हवे ते ज्ञान मिळवू शकील.  प्रत्येक क्षेत्रात शिक्षण, व्यवसाय , खेळ  या सर्व ठिकाणी काय घडतंय हे त्याला वेबसाइट वरून समजू शकेल. गूगल वरून तो हवी ती माहिती आपल्या भाषेत आत्मसात करू शकेल.
तांत्रिकी शिक्षण आपल्या मायबोलीतून असेल तर खेड्यापाड्या तुन त्याचा प्रसार सहज होईल त्यामुळे प्रत्येक व्यक्ती शिक्षित होईल जशे हे शिक्षण मातृभाषेमूळे सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येईल. हे अधिकाधिक स्वस्त दरात सरकार ने काही योजनां मधून याचा प्रसार खेडोपाडी केला पाहिजे .
सरकार ने काही योजनेतून संगणकाची ओळख जगाला करून दिली तर लोकांचीही मानसिकता बदलेल . ते संगणकचा वापर सहज प्रत्येक क्षेत्रात करू शकतील
शहराप्रमाणे खेड्यात देखील आयटी कंपन्या सुरु करून लोकांचे ज्ञान वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे खेड्यापाड्यातील बेरोजगारी ची समस्या संपुस्तत येईल. अभियंत्यांनी तंत्रन्यानाची माहिती दिली गेली, त्याचे प्रशिक्षण दिले गेले, तर सामान्य मनुष्याचा विकास होईल. शहरा मध्ये प्रत्येक क्षेत्रात जसा तंत्रन्यानचा वापर होतो, तसा तो खेडोपाडी केला जाईल. इंटरनेट सर्वांपर्यंत पोचवण्यासाटी वेग वेगळे प्रकल्प अंमलात आणले पाहिजे .  प्राकलप लून , गावोगावी इंटरनेट पोचवण्याचे काम करणार आहे. इंटरनेट मुळे आपल्याला जगाच्या पाठीवरची कोणती हि माहिती सहज रित्या मिळू शकते हे लोकांना समजले पाहिजे
तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणी व मार्ग -:
१-] लोकांची मानसिकता-
लोकांनी संगणक अधिकाधिक वापरण्यास सुरुवात करायला हवी. त्यामुळे कोणताही तोटा होत नाही.
२-] सरकारद्वारा प्रकल्पातून मदत-
सरकारने वेगवेगळे प्रकल्प राबवून लोकांना शिक्षित व सुजाण करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत . आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आर्थिक मदत व निरनिराळ्या सेवा देऊन सक्षम करायला हवे.
३-] तांत्रिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
तांत्रिक शिक्षण सर्वांना माफक फी मध्ये उपलब्ध करून देण्याबरोबरच गरीब व मागास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देऊन शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
४-] योग्य अभ्यासक्रम व मार्गदर्शन-;
विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमाची योग्य समीक्षा करून तो अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत करून विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवला पाहिजे.
आयटी कंपन्या व प्राध्यापक यांनी निरनिराळे आधुनिक संशोधन एकत्रित येऊन करायला हवे त्यामुळे निर्माण होणारे संशोधन अधिकाधिक उपयुक्त होऊ शकेल.
– ओंकार वाघ, पुणे

आमच्या मराठी तंत्रज्ञान लेख स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा लेख.