मागील शतकातील तंत्रज्ञानाची सर्वात मोठी किमया म्हणजे संगणक होय! ही किमया अर्थात जादू संगणक ज्या पद्धतीने करतो, त्या पद्धतीचे नाव आहे बाइनरी सिस्टीम. संगणकामध्ये सर्वच गोष्टी बायनरी मध्ये केल्या जातात. आपण अंक मोजण्यासाठी जी पद्धती वापरतो ती आहे डेसिमल अर्थात दशमान पद्धती. तिच्यामध्ये शून्य ते नऊ असे दहा अंक आहेत. परंतु संगणकाला ही दशमान पद्धती समजत नाही. त्याला समजते ती ‘बायनरी नंबर सिस्टीम’. ह्या बायनरी मध्ये केवळ शून्य आणि एक असे दोन अंक वापरले जातात. तुमच्यापैकी अनेकांनी या बद्दल ऐकले असेलच. प्रोग्रामिंग असो वा डेटा स्टोरेज संगणक फक्त बायनरी नंबर सिस्टीम वापरतो. अर्थात संगणकाला सर्व कामे करण्यासाठी फक्त शून्य आणि एक यांचेच संयोजन करावे लागते. खरतर या पद्धतीचा उगम सतराव्या शतकात गॉडफ्राईड लेबनीज यांनी केला होता. तदनंतर अनेक छोट्या मोठ्या गणितज्ञांनी त्यात अल्गोरिदम ची भर घातली. यामध्ये सर्वात मोठे योगदान होते ते जॉर्ज बुली यांचे. १८४७ मध्ये जॉर्ज बुली यांनी एका रिसर्च पेपर मध्ये बायनरी नंबर सिस्टीम वापरून एका नव्या गणिती शाखेला जन्म दिला. तिचे नाव होते ‘बुलियन अल्जेब्रा’ आणि इथूनच संगणकामागच्या लॉजिक ची अर्थात तर्कशास्त्राची खरी सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या सुरुवातीला क्लाड शेनॉन यांनी त्यात आणखी भर घातली व आधुनिक संगणकाचे लॉजिक तयार होत गेले. आजही संगणकामध्ये बायनरी सिस्टिम वापरली जाते. संगणकातील माहिती साठवण्यासाठी याच पद्धतीचा उपयोग होतो. ही माहिती मोजण्यासाठी विविध एकके तयार करण्यात आलेली आहेत. त्यातली काही एकके सर्वसामान्य संगणक वापरकर्त्याला चांगलीच ज्ञात आहेत. आपली मजल केबी एमबी जीबी पर्यंत सर्वसाधारणपणे जाते. परंतु या व्यतिरीक्त ही माहिती मोजण्यासाठी अनेक एकके संगणकात उपलब्ध आहेत. त्यांची माहिती घेऊयात.
शून्य किंवा एक यांना एक बिट अर्थात ‘बायनरी डिजिट’ असे म्हणतात. 4 बिट्सने बनते 1 निबल आणि आठ बिट्सचा एक बाईट. १६ बिटसला एक वर्ड असेही म्हणतात. १०२४ बाईट्सचा बनतो एक किलोबाईट. आता पुढे पाहू यात.

१०२४ किलोंबाईट = १ मेगाबाईट
१०२४ मेगाबाईट = १ गिगाबाईट
१०२४ गिगाबाईट = १  टेराबाईट
१०२४ टेराबाईट = १ पेटाबाईट
१०२४ पेटाबाईट = १ एक्झाबाईट
१०२४ एक्झाबाईट = १ झेटाबाईट
१०२४ झेटाबाईट = १ योटाबाईट
१०२४ योटाबाईट = १ बरोंटोबाईट
१०२४ बरोंटोबाईट = १ जिओपबाईट
१०२४ जिओपबाईट = १ सेगनबाईट
१०२४ सेगनबाईट = १ पिजाबाईट
१०२४ पिजाबाईट = १ अल्फाबाईट
१०२४ अल्फाबाईट = १ क्रायटबाईट
१०२४ क्रायटबाईट  = १ अमॉसबाईट
१०२४ अमॉसबाईट = १ प्रॉक्टलबाईट
१०२४ प्रॉक्टलबाईट = १ बॉल्गरबाईट
१०२४ बॉल्गरबाईट = १ सम्बोबाईट
१०२४ सम्बोबाईट = १ क्वेसाबाईट
१०२४ क्वेसाबाईट = १ किँसाबाईट
१०२४ किँसाबाईट = १ रुथेरबाईट
१०२४ रुथेरबाईट = १ डुबनीबाईट
१०२४ डुबनीबाईट = १ सीबॉर्गबाईट
१०२४ सीबॉर्गबाईट = १ बोहरबाईट
१०२४ बोहरबाईट = १ हसीयूबाईट
१०२४ हसीयूबाईट = १ मेंट्नारबाईट
१०२४ मेंट्नारबाईट = १ डार्मस्टाडबाईट
१०२४ डार्मस्टाडबाईट = १ रोएन्टबाईट
१०२४ रोएन्टबाईट = १ कॉपरबाईट

संगणक मेमरी मोजण्याचे ‘कॉपरबाईट’ हे सर्वात मोठे एकक आहे!

तुषार कुटे,